सांगोला – आ.सुभाषबापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत लोकमंगल बँक व चिणके ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने महिला उद्योजकांसाठी कर्ज विषयक मार्गदर्शन शिबिर तसेच गौरी-गणपती आरास स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी सांगोला शाखेचे व्यवस्थापक शिवाजी दरेकर यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याचे आवाहन केले. लोकमंगल बँकेचे अधिकारी सुदन सुरवसे यांनी लोकमंगल बँकेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांअंतर्गत आवश्यक अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे सांगितले. याप्रसंगी येत्या महिला दिना अखेर गावातील किमान १०० महिलांनी उद्योजक होण्याचा संकल्प केला. यावेळी उपसरपंच मोहन मिसाळ यांनी आ.सुभाषबापू देशमुख यांचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी गौरी-गणपती आरास स्पर्धेतील विजेत्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.
चौकट-
गौरी-गणपती आरास स्पर्धेतील विजेत्या