बार्शी – राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त उंडेगाव येथे लायन्स क्लब बार्शी रॉयलच्यावतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, उंडेगाव येथे वृक्षारोपण व स्वच्छता अभियान राबविण्यात आले. लायन्स क्लबच्या सदस्यांनी शाळेचा परिसर स्वच्छ करुन विविध वृक्षांची लागवड केली.
याचबरोबर जिल्हा परिषद शाळा, उंडेगाव येथील विद्यार्थ्यांना लायन्स क्लब बार्शी रॉयलच्यावतीने खाऊचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
या कार्यक्रमास न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक विजयसिंह पाटील, उंडेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी लायन्स क्लब बार्शी रॉयलचे अध्यक्ष ला. मंगेश बागुल, सचिव ला. दयानंद रेवडकर, खजिनदार ला. उमेश जाधव तसेच क्लबचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
Post Views: 7