सांगोला – सांगोला येथील चैतन्य हास्य योग मंडळाचा २३ वा वर्धापन दिन उत्साहात पार पडला. यानिमित्त प्रमुख मार्गदर्शक गणेश लवटे यांनी ध्यानाचे महत्व पटवून देत उपस्थितांकडून प्रात्यक्षिक करून घेतले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी डॉ.कृष्णा इंगोले, भागवत पैलवान यांनी मनोगतात मंडळाच्या २३ वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रवासाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष डी.डी.जगताप, सूत्रसंचालन प्रा.राजेंद्र ठोंबरे, आभार प्रदर्शन भीमाशंकर पैलवान यांनी केले. या वर्धापन दिन सोहळ्यास मंडळाचे सर्व सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.