सोलापूर : जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर सोलापूर महापालिकेच्या सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निवारण निधीसाठी देण्यात यावे, अशी मागणी समाजसेवक सागर टूरके, वैभव जवळकोटे आणि राजू अण्णा कलमाडी यांनी महापौर विनायक कोंड्याल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
केवळ याच विषयावर चर्चा करण्यासाठी महापालिकेची विशेष सभा बोलावून सर्वपक्षीय एकमताने ठराव मंजूर करावा. निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने तिचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेत संबंधित निवडणूक प्राधिकरणाकडून आवश्यक मार्गदर्शन किंवा पूर्वपरवानगी घ्यावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
ठराव मंजूर झाल्यानंतर नगरसेवकांच्या एका महिन्याच्या मानधनातून जमा होणारी रक्कम अधिकृत प्रक्रियेद्वारे जिल्हाधिकारी यांच्या दुष्काळ निवारण निधीकडे सुपूर्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
—
Post Views: 22