मंगळवेढा – शहरातील रस्त्यावर दारु पिवून पडल्याने सतिश अमृत पाटील (वय 33 वर्षे रा. बनाळी जि.बेळगाव) याचा मृत्यू झाला असल्याची नोंद पोलीसात झाली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील खबर देणारे विठ्ठल बेकणे (वय 44 रा.धर्मगाव रोड) हे सेंट्रींग व्यावसायिक असून त्यांच्याकडे मयत सतिश पाटील हा एक महिन्यापासून बांधकाम कामावरती मजुरीने होता. दि.6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता खबर देणारे यांच्याकडे काम करणारे सलिम तिगडी यांनी फोन करुन सांगीतले की, आपल्या कामावरील सतिश पाटील हा हॉटेल स्वाद जवळ दारु पिवून पडलेला असून तुम्ही लगेच या. यातील खबर देणारे सदर ठिकाणी आल्यानंतर मयतास ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथे उपचारासाठी घेवून गेले, मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून तो उपचारापुर्वीच मयत झाल्याचे सांगीतले. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.