अक्कलकोट – आजच्या धावपळीच्या आणि मोबाईलच्या युगात मुलांनी आपल्या संस्कारांकडे दुर्लक्ष न करता दिवसाची सुरुवात आई-वडिलांना नमस्कार करून व त्यांचा आशीर्वाद घेऊन करावी, असे प्रतिपादन लायन्स कल्ब चे माजी प्रांतपाल राजशेखर कापसे यांनी येथे बोलताना केले.
अक्कलकोट तालुक्यातील हंजगी येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना
लाईन्स कल्ब ऑफ सोलापूर च्या वतीने सेवा सप्ताह अंतर्गत कै. संजय कोरे यांच्या स्मरणार्थ शैक्षणिक साहित्य, खेळ साहित्य व अन्नदान वाटप करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राजशेखर कापसे हे बोलत होते.
यावेळी लायन्स क्लब सोलापूर चे अध्यक्ष मंजूनाथ दर्गोपाटील, सचिव विकास पाटील ,खजिनदार धनराज कोरे पाटील. माजी प्रांतपाल राजशेखर कापसे, अभय खोबरे, प्रभाकर मजगे, प्रांतीय सभापती मल्लिकार्जुन मसुती,
सुस्मीता कोरे ,संजय कोरे ,सतीश बुरूडकर, संजय म्हमाणे, विजयालक्ष्मी म्हमाणे. अमोल गवसणे आदी लाईन्स कल्ब चे पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना राजशेखर कापसे म्हणाले की, आई-वडील मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आयुष्यभर कष्ट घेतात. त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवून त्यांना नमस्कार करणे हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा सुंदर संस्कार आहे. पालकांचा आशीर्वाद मुलांना आत्मविश्वास, सकारात्मक ऊर्जा आणि चांगले विचार देत असतात. भारतीय संस्कृतीत “मातृदेवो भव, पितृदेवो भव” या विचाराला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे मुलांनी पालकांसोबत प्रेमाने संवाद साधावा, त्यांच्या भावनांचा आदर करावा आणि गरजेच्या वेळी त्यांना मदत करावी.
पालकांचा सन्मान केवळ पाया पडण्यापुरता मर्यादित नसून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणणे हाच खरा संस्कार असल्याचे सांगितले. यावेळी मंजूनाथ दर्गोपाटील, सचिव विकास पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धाराम चौधरी तर आभार चिदानंद बाबा यांनी मानले.