पंढरपूर – येथे होणाऱ्या वारकरी महाअधिवेशानाच्या निमित्ताने येथील तांबडा मारुती परिसरातील सोपानकाका पालखी मंडप येथे सुरु करण्यात आलेल्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन वारकरी संप्रदाय पाईक संघाचे संस्थापक देवव्रत (राणा) महाराज वासकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मठाधिपती, महाराज मंडळी उपस्थित होते.
येत्या २६ ऑक्टोबर २०२६ रोजी पंढरपूरात वारकरी महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. राज्यातील नव्हे तर देशपातळीवरील सर्व वारकरी संघटना या अधिवेशनात सहभागी होणार आहेत. वारकरी संप्रदाय पाईक संघावर या अधिवेशाचे समन्वयक म्हणून जबाबदारी आहे. वारकरी महाअधिवेशानाची तयारी सध्या येथे सुरु आहे. या वारकरी महाअधिवेशानाच्या निमित्ताने येथील तांबडा मारुती परिसरातील सोपानकाका पालखी मंडप येथे संपर्क कार्यालय सुरु करण्यात आलेले आहे. या कार्यालयाचे उदघाटन वारकरी संप्रदाय पाईक संघाचे संस्थापक देवव्रत ( राणा ) महाराज वासकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी वारकरी संप्रदाय पाईक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भागवत महाराज शिरवळकर, महाराष्ट्र अध्यक्ष श्याम महाराज उखळीकर तसेच पाईक संघाचे महाराष्ट्र सचिव महेश भिवरे आदींसह बहुतांश राष्ट्रीय व महाराष्ट्रीय कार्यकारणी पदाधिकारी यावेळी प्रमुख उपस्थित होते. या कार्यालयातून या पुढील काळात अधिवेशानाच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. या बरोबरच अधिवेशानाच्या तयारी मध्ये समन्वय रहावा यासाठी हे कार्यालय सुरु करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी नागेश महाराज बागडे, रघुनाथ महाराज कबीर, भरत महाराज अलिबागकर, हरी महाराज लबडे , भागवत महाराज हांडे ,माधव महाराज बडवे, योगेश महाराज पिंपळनेरकर, सचिन महाराज गोसावी, रामकृष्ण हनुमंत महाराज वीर तसेच पाईक संघ भक्ती शक्ती आयाम प्रमुख सौरभ थिटे पाटील उपस्थित होते.
Post Views: 12