सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक रणधुमाळी
तभा वृत्तसेवा
सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सोमवार पासून उमेदवारी अर्ज विक्री आणि स्वीकृती ही प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या दिवशी 219 जणांनी अर्ज घेतले होते. दुसऱ्या दिवशी मंगळवारी चार उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामध्ये सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश हसापुरे यांचे चिरंजीव श्रीदीप हसापुरे यांनी सोसायटी मतदारसंघातून आपला उमेदवार अर्ज दाखल केला आहे.
यासह बँकेचे माजी उपाध्यक्ष नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले बबनराव अवताडे यांनी आपल्या दोन्ही चिरंजीवांसह स्वतःचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांच्याकडे दाखल केला.
बबनराव बाबुराव अवताडे, सिद्धेश्वर बबनराव अवताडे आणि सुशील बबनराव अवताडे या तिघांनी सोसायटी मतदारसंघातून एकत्रित अर्ज दाखल केले.



















