सांगोला – तिप्पीहाळी, ता.सांगोला येथील कॅनलजवळ मंगळवार दि.२७ ऑक्टोबर रोजी रात्री पावणे दोन ते दोन वाजण्याच्या सुमारास चार चाकी गाडी चालवणाऱ्याच्या डोक्यात पाठीमागून गोळ्या मारून खून केल्याची घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, मंगळवार दि.२७ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे पावणे दोन ते दोन वाजण्याच्या दरम्यान प्रतापसिंह उर्फ गब्बर ज्ञानु करचे (वय-३२) रा.पाचेगाव बु., ता.सांगोला हे सांगोला येथुन किडेबिसरी ता.सांगोला येथे येत असताना बालाजी ऊर्फ हर्षवर्धन नामदेव ऐवळे, विकी शिवाजी घेरडे, दोघे रा.किडेबिसरी, ता.सांगोला यांनी संगनमत करून प्रतापसिंह ऊर्फ गब्बर ज्ञानू करचे हे गाडी चालवित असताना पाठीमागुन डोकीत उजव्या बाजुला पिस्टलने गोळ्या मारुन गंभीररित्या जखमी करुन त्यांचा खुन केला. याबाबत अर्चना प्रतापसिंह ऊर्फ गब्बर करचे, रा.पाचेगाव बु., ता.सांगोला यांनी सांगोला पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आहे. पुढील तपास सांगोला पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे करत आहेत. दरम्यान घटनास्थळाला पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे यांनी भेट दिली. तसेच आरोपी बालाजी ऊर्फ हर्षवर्धन ऐवळे व विकी घेरडे या दोन्ही आरोपींना सांगोला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Post Views: 16