सांगोला – आरोग्य उपकेंद्र एखतपूर, ता.सांगोला अंतर्गत राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत एखतपूर गावातील विविध जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाड्यांमधील बालकांना जंतनाशक म्हणून वापरण्यात येणारी अल्बेंडाझोल गोळ्यांचे वाटप करून त्या नियोजित पद्धतीने देण्यात आल्या. यावेळी एखतपूर गावचे प्रशासक व आरोग्य विस्तार अधिकारी मिलिंद सावंत यांनी मुलांना योग्य आहार, आरोग्य, जंतनाशक दिनाचे व गोळ्यांचे महत्व याविषयी मार्गदर्शन केले. या मोहिमेत एखतपूर उपकेंद्राच्या आरोग्य सेविका किर्तीमाला पाटील, सीएचओ वासीम शेख, आरोग्य सेवक राहुल नरुटे, आशा शिंदे यांनी सहभाग घेतला. मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, एखतपूर केंद्र शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. बालकांना जंतमुक्त ठेवणे, त्यांचे आरोग्य चांगले राखणे आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
Post Views: 16