सोलापूर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठ लोणेरे (रायगड) अंतर्गत सोलापूर झोनल फुटबॉल या स्पर्धेतील चुरशीच्या सामन्यांनंतर यजमान ऑर्किड, एमजीएम नांदेड, ए. जी. पाटील आणि व्ही.व्ही.पी. या चार संघांनी उत्कृष्ट कामगिरी करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
येथील एन. के. ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर या स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य तथा सोलापूर झोनचे चेअरमन डॉ. बी. के. सोनगे यांच्या हस्ते फुटबॉल किक मारून उत्साहात करण्यात आले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. एस. एस. मेतन, सोलापूर विद्यापीठ सिनेट व व्यवस्थापन परिषद सदस्य आणि झोनल सचिव प्रा. सचिन गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा समन्वयक प्रा. ए. एस. जामदार, प्रा. ऋचा श्रीराम, पात्रता समिती सदस्य प्रा. वामने, प्रा. शिवशरण कोरे, प्रा. मनोजकुमार राठोड, प्रा. शेख, विद्यार्थी सचिव प्रतीक डांगे, सौरभ पांढरभिसे, श्रेया पुल्ली यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
——
सुरुवातीच्या फेरीचे निकाल:
व्ही. व्ही. पी. (सोलापूर) विजयी विरुद्ध संदीपानी कोळपा (लातूर) ३-१.
एमजीएम (नांदेड) वि. बीगसी (सोलापूर) :३-१.
एन. के. ऑर्किड (सोलापूर) वि. व्ही. के. पाटील (धाराशिव) ३-०.
ए. जी. पाटील सोलापूर वि. तेरणा (धाराशिव) ३-१.
———-
असे होणार उपांत्य फेरीचे सामने :
एमजीएम (नांदेड) विरुद्ध एन. के. ऑर्किड कॉलेज (सोलापूर)
व्ही. व्ही. पी. (सोलापूर) विरुद्ध ए. जी. पाटील (सोलापूर).




















