बँक ऑफ महाराष्ट्रच्या टेंभुर्णी शाखेतर्फे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत (कै.) दत्तात्रय ज्ञानदेव सराडे यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या वारसदार श्रीमती रेश्मा दत्तात्रय सराडे यांना ₹२,००,००० इतकी विमा रक्कम प्रदान करण्यात आली.
(कै.) दत्तात्रय ज्ञानदेव सराडे यांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षण घेतले होते. त्यांच्या अपघाती निधनानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, टेंभुर्णी शाखेच्या माध्यमातून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून विमा दावा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली व त्यांच्या वारसदारांना दोन लाख रुपयांची विमा रक्कम अदा करण्यात आली.
या विमा दावा प्रक्रियेसाठी बँक ऑफ महाराष्ट्र, टेंभुर्णी शाखेचे शाखा व्यवस्थापक श्री. दादाराव दुभाळकर, शाखेतील अधिकारी व कर्मचारी तसेच बँक मित्र श्री. अजित बनकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. बँक अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे संबंधित वारसदारांना विमा योजनेचा लाभ मिळू शकला.
याप्रसंगी बँकेच्या वतीने नागरिकांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजना यांसारख्या सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.
Post Views: 35