अक्कलकोट : आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती बोरोटी (खुर्द), ता. अक्कलकोट येथे ग्रामपंचायतीसमोर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी गावातील प्रतिष्ठित नागरिक तथा काशीलिंगेश्वर देवस्थान कमिटीचे प्रमुख काशिनाथ पाटील यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी ग्रामसेवक सोमनाथ खरडे, सरपंच हुसेनी नंदिवाले, काशिनाथ पाटील, मल्हारी मुळे सांगितले, सिद्धाराम पाटील, तुकाराम कोळी, संतोष कोळी, चंद्रकांत कोळी, विजयकुमार हालोळी, महांत खोबण, सिद्धाराम कोळी, सचिन कोळी, बसवराज कोळी, राजकुमार हालोळी तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सिद्धाराम बिराजदार यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक व समाजबांधव उपस्थित होते.
याप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळा, बोरोटी (खुर्द) येथील उपशिक्षक शरणप्पा फुलारी यांनी आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांच्या जीवनकार्याची माहिती देऊन त्यांच्या महान साहित्यिक योगदानावर प्रकाश टाकला. महर्षी वाल्मिकी यांनी रामायणासारख्या महान महाकाव्याची निर्मिती करून भारतीय संस्कृती, साहित्य आणि नैतिक मूल्यांच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या जीवनातून आदर्श विचार, सदाचार आणि संस्कारांची प्रेरणा मिळते, असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले.
कार्यक्रमादरम्यान गावातील प्रतिष्ठित नागरिक संतोष कोळी यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना बिस्किटांच्या पाकिटांचे वाटप केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
महर्षी वाल्मिकी यांच्या विचारांचे स्मरण करून सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि संस्कारांचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या कार्यक्रमाची सांगता झाली.शरणप्पा फुलारी यांनी सूत्रसंचलन केले. अनंत बांगर यांनी आभार मानले.
फोटो:- बोरोटी (खुर्द) येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले.यावेळी प्रतिमेचे पूजन करताना काशिनाथ पाटील,मल्हारी मुळे,संतोष कोळी,तुकाराम कोळी,सोमनाथ खराडे,सिद्धाराम बिराजदार आणि ग्रामस्थ दिसत आहे.