सांगोला – माणगंगा परिवार व पालवी ॲग्रीको, सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने डाळिंब आणि जागतिक बाजारपेठ या विषयावर आयोजित चर्चासत्र रामकृष्ण गार्डन, सांगोला येथे उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाची सुरुवात बळीराजाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून झाली. प्रास्ताविकात माणगंगा परिवाराचे नितीन इंगोले यांनी शेतकऱ्यांनी केवळ स्थानिक बाजारपेठेपुरते मर्यादित न राहता जागतिक बाजारपेठेतही आपला ठसा उमटवावा, या उद्देशाने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल्याचे नमूद केले. यावेळी अपेडाचे माजी सल्लागार शरद नानापुरे यांनी डाळिंबासह इतर कृषिमालासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या संधींची माहिती दिली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी निर्यातीसंदर्भात विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. यानिमित्त शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शेती उपयोगी साहित्य व विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास माणगंगा परिवाराच्या चेअरमन अर्चना इंगोले, संचालक विवेक घाडगे, सचिन इंगोले, रोहिणी इंगोले, महादेव शिंदे, पोपट केदार, तोडकरी उपस्थित होते.
Post Views: 10