पंढरपूर – मागील तीन महिन्यापासून येथील उपजिल्हा रुग्णालयतील सिटीस्कॅन मशीन
बंद आहे. अशाच प्रकारच्या मशिन राज्यातील १७ रुग्णालयात सीटीस्कॅन मशीन बंद अवस्थेत आहेत असे समजते.
ग्राहक पंचायतीने राज्याचे आरोग्य मंत्री, तसेच शासनाच्या विविध पातळीवर पत्र व्यवहार केले,अनेक सामाजिक संघटनांनीही याबद्दल वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने केली,आवाज उठविला.मात्र अद्याप या प्रयत्नांना यश मिळाले नाही याबद्दल खंत वाटते. खुद्द येथील लोकप्रतिनिधींनी याबाबत प्रशासनाला सुचना केली. तथापि असंवेदनशील प्रशासनाने जिल्हा पातळीवर, जिल्ह्याने उपसंचालकाकडे, उपसंचालकानी आरोग्य संचालक यांच्याकडे कागदोपत्री प्रयत्न केले.
याबाबत पाठपुरावा म्हणून ग्राहक पंचायतीने शासकीय विभागाकडे संपर्क केल्यावर आम्ही वरिष्ठाकडे पत्रव्यवहार केला आहे,आर्थिक बाब असल्याने हा आमच्या अधिकारातील विषय नाही, त्यामुळे आम्ही काही करू शकत नाही इथपर्यत अधिकाऱ्यांकडून संवेदनाशुन्य उत्तरे ऐकावयास मिळाली. तसेच कोणत्याही पत्राचे उत्तर देण्याचे सौजन्य कोणत्याही
कार्यालयाने दाखविले नाही.
तीन महिन्याच्या कालावधीत सिटीस्कॅनची गरज असणाऱ्या हजारो रुग्णांना सेवा मिळाली नाही,भरमसाठ शुल्क भरून त्यांना खाजगी रुग्णालयातून सिटीस्कॅन करून घ्यावे लागले.
शासन रोज आरोग्य विषयक नवनवीन संकल्पना, योजना जाहीर करीत आहे. मात्र आहे ती यंत्रणा तातडीने, प्राधान्याने दुरुस्त करून जनतेसाठी त्याची सेवा उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक आहे,त्याकडे दुर्लक्ष होत आहे ही वस्तुस्थिती आहे.तरी शासन,प्रशासनाने महाराष्ट्रातील सर्व सिटीस्कॅन मशीन तात्काळ सुरू कराव्यात व रुग्णांना सेवा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी ग्राहक पंचायतीच्या पदाधिकार्याकडून करण्यात आली आहे.
Post Views: 7