बार्शी – महाराष्ट्रातील सार्वजनिक विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ५ नोव्हेंबर रोजी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या धडक मोर्चात श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी येथील सर्व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होणार आहेत. या संदर्भात महाविद्यालयाच्यावतीने मोर्चात सहभागी होण्याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.
राज्यातील सार्वजनिक विद्यापीठे व महाविद्यालयांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी, प्रलंबित मागण्यांची पूर्तता आणि विविध सेवा विषयक प्रश्नांची सोडवणूक यासह अनेक बाबींवर शासनाकडून ठोस निर्णय होण्याची अपेक्षा आहे. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी सेवक संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे.
दरम्यान, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सकारात्मक आश्वासन दिले असले, तरी प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी आवश्यक शासन निर्णय व अधिकृत अधिसूचना निर्गमित होणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी पुण्यात धडक मोर्चा व धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
या आंदोलनात श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी येथील सर्व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होणार असल्याने आंदोलनाला महाविद्यालयाचा सक्रिय पाठिंबा मिळणार आहे. कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांना बळकटी देण्यासाठी एकजुटीने आंदोलनात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
जिल्हा सचिव भिमा मस्के, जिल्हा कार्यकारणी सदस्य शरद मस्के रामराजे सूर्यवंशी आनंद देशमुख शिवाजी हाके अभिमान ढगे व इतर कर्मचारी दीपक शिर्के संदिपान पिंगोरे चंदू मोरबाळे विक्रम काकडे लांडगे भाऊ चंद्रकांत गव्हाणे हनुमंत घावटे बालाजी घाडगे सचिन मोरे मोळवणे मॅडम सुनिता शिंदे मॅडम
Post Views: 13