सोलापूर – कै. संगप्पा याळगी वाराही देवी सेवार्थ भारत फाउंडेशन सोलापूर व पुणे यांच्यावतीने अनाथ मुले व वृद्धाश्रमातील वृद्ध माता पित्यांबरोबर दिवाळी साजरी करुया असा अनोखा उपक्रम घेण्यात आल्याची माहिती संस्थेचे मल्लिनाथ याळगी यांनी दिली आहे.
परिस्थितीने मुलं अनाथ झाले. परिस्थितीने वृद्ध वृद्धाश्रमामध्ये आले. ते ही लोक दिवाळी साजरी केली पाहिजे. नवीन कपडे घातले पाहिजे व फटाके उडवून आनंद मानला पाहिजे, असा उद्देश उपक्रमामागे आहे. आम्ही फाउंडेशनच्यावतीने त्यांना दिवाळी फराळ देऊन फटाके उडवण्यास देऊन दिवाळी साजरी करायचे ठरवले आहे. ज्यांना वाटते की खरंच हे लोक ही दिवाळी साजरी केली पाहिजे अशा दानशूरांनी पुढे येऊन आपल्या घरात तुमच्यासाठी बनवलेले फराळातून थोडा फराळ द्यावा. अथवा देणगी स्वरूपात द्यावे. आलेल्या देणगीतून फराळ घेऊन, कपडे घेऊन वृद्ध माता पित्याना कपडे घेणार आहत. सर्वजण मिळून यंदाची दिवाळी त्यांच्या बरोबर बसून साजरी करूया. त्यांच्या आनंदात सहभागी होऊया. आर्थिक मदतीसाठी ९७३०८७२०८७ या मल्लिनाथ याळगी यांच्या क्रमांकावर दान करावे असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी मध्यवर्ती गणेशोतसव मंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष श्रीशैल बनशेट्टी, माजी चेअरमन परिवहन समिती सुभाष चव्हाण, पोलीस निरीक्षक विनय सरवदे, विजय बिराजदार, रामेश्वर याळगी, प्रिती याळगी, राजकुमार याळगी, अशोक याळगी, सुमीत याळगी, अशोक याळगी, धानप्पा याळगी, कल्लप्पा शिंपी, भिमाशंकर मुकसाने आदी परिश्रम घेत आहेत.
—–
Post Views: 13