सोलापूर : भवानी पेठ येथील सो. स. क्षत्रिय समाज ( विठ्ठल मंदिर ) ट्रस्ट संचालित,सहस्त्रार्जुन शैक्षणिक संस्थेस बी द चेंज फाऊंडेशन, शिर्डी यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय ‘आदर्श शिक्षण संस्था चालक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. रविवार, दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी शिर्डी येथे आयोजित कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सो. स. क्षत्रिय समाज ( विठ्ठल मंदिर ) ट्रस्ट च्या वतीने सहस्त्रार्जुन शैक्षणिक संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचे सत्कार समारंभ संकुलाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे अध्यक्ष संजीवसा बिद्री हे लाभले होते. या प्रसंगी व्यासपीठावर सत्कारमूर्ती तसेच सहस्त्रार्जुन शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष राजुसा भुमकर, संस्थेचे सचिव जयकुमारसा कोल्हापुरे, शैक्षणिक संस्थेचे सचिव गजाननसा गोयल, संस्थेचे सदस्य सुरेशसा बिद्री, भरतकुमार शालगर, संजीवसा रंगरेज, गणेशसा दामजी, शिरीषसा कोल्हापुरे, शैक्षणिक संस्थेचे सदस्य सर्वश्री अनिलसा रंगरेज, तुकारामसा पवार आदिसह प्रशालेचे मुख्याध्यापक मोरेश्वर काटवे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मंजुषा माने, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी बिराजदार उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वतीदेवी व संकुलाचे संस्थापक कै. बाबुरावसा भुमकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष, सचिव व सर्व सदस्यांचा संस्थेचे अध्यक्ष संजीवसा बिद्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सहशिक्षिका विद्या चव्हाण यांनी केले तर आभार सहशिक्षिका सिमा शिमगे यांनी मानले.
—
Post Views: 11