कुर्डुवाडी – नगरपरिषदेची विशेष सभा गुरुवार रोजी कै काशिनाथ भिसे सभागृहात पार पडली दोन्ही गटाचे नगरसेवकाचे मनोमिलन झाल्याने सर्व नगरसेवकांनी काम चुकार सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्याची तीन तास चांगली झाडाझडती घेतली नगरसेवकाचे रौद्ररूप पाहून कर्मचारी भांबावून गेले होते .
सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष जयश्री भिसे होत्या यावेळी मुख्याधिकारी सचिन तपासे व उपनगराध्यक्ष सविता जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू झालेली ही सभा विविध कारणांमुळे अत्यंत वादळी आणि चर्चेची ठरली या बैठकीत तब्बल ८९ विषयांवर विचार विनिमय करण्यात आला यामध्ये बहुतांश विकास कामांना मंजुरी देण्यात आली असली तरी काही विषयांवर नगरसेवकांनी तीव्र आक्षेप नोंदवले
सभेतील खरा वाद शहरातील रस्त्यांच्या काँक्रीटी करणावरून झाला प्रभाग क्रमांक १० मधील विविध सिमेंटच्या रस्त्याच्या कामांवर नगरसेवकांनी आक्षेप घेतला रस्ते काँक्रीटी करणासाठी संबंधित रस्ता किमान १० वर्षे जुना असावा हा नियम पाळला गेला नसल्याचे सदस्यांनी निदर्शनास आणून दिले
याशिवाय वारंवार घेतल्या जाणाऱ्या हद्दवाढीच्या विषयावरही सदस्यांनी हरकत घेत हद्दवाढ प्रकरणी सर्वांना विश्वासात घ्यावे असा सूर लावून धरला
भुयारी गटार सारख्या विकासकामांना दिली जाणारी मुदतवाढ यापुढे देण्यात येऊ नये तसेच नगरसेवकांनी शहरातील विविध नागरी समस्या मांडल्या यामध्ये नगरसेविका भाग्यश्री पाटील यांनी शहरात होणारा अनियमित पाणीपुरवठा, डॉ. मोहसीन मकणु यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणा पुन्हा सुरू करणे व तळे निर्माण करण्यासाठी गायरान जमिनीची मागणी करणे
तर नगरसेवक संजय टोणपे यांनी अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीचा विषय सभागृहात लावून धरला एकंदरीत ही सभा प्रशासनाला धारेवर धरणारी ठरली या सभेस नगरसेवक समीर मुलाणी ऋषिपाल वाल्मिकी शकील तांबोळी आनंद कदम अमरकुमार माने शाहीस्ता चाऊस पल्लवी कांबळे संजय टोणपे भाग्यश्री पाटील डॉ. मोहसीन मकणु स्नेहा गवळी जगन्नाथ क्षीरसागर वृषाली गांधी शुभ्रा गोरे वसीम मुलाणी वनीता सातव अंजली गावडे अबोली चौधरी रेश्मा गोरे सरस्वती क्षीरसाग उपस्थित होते .
चौकटीत
मुलींची शिक्षका विषयी तक्रार
नगरपालिकेच्या सभेमध्ये नगरपालिकेच्या ज्यनिअर कॉलेजमधील एक विद्यार्थिनीला सभेमध्ये बोलवण्यात येऊन तिने शिक्षक शिकवत नाहीत वर्गात ही येत नाहीत यामुळे तसेच काही शिक्षका विषयी तक्रारी भर सभेत विद्यार्थिनींनी केल्या
कर्मचाऱ्याला दोन महिन्याची मुदत
नगरपालिकेच्या बैठकीमध्ये कामचुकार व कर्मचाऱ्या वरती शिस्तभंगाची कारवाई कराचा विषय होता पण तू सर्व नगरसेवकांनी कर्मचाऱ्यांना चांगले वागण्यासाठी दोन महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे यानंतर त्यांची गय करण्यात येणार नाही अशी समज त्यांना दिली