अकलूज – शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूल, यशवंतनगर येथे प्रथम सत्राच्या शेवटच्या दिवशी दिवाळी पार्टी झाली.
विद्यार्थ्यांनी तयार केलेले आकाशकंदील, कागदकाम, रांगोळी यांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. मुख्याध्यापक जितेंद्र माने-देशमुख यांनी विद्यार्थ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत गरिबांना मदत करा, अभ्यास विसरू नका, फटाके काळजीपूर्वक फोडा असा संदेश दिला.
खासदार धैर्यशील मोहिते-पाटील व संस्थेच्या अध्यक्षा शितलदेवी मोहिते-पाटील यांचा शुभेच्छा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांना बालुशाहीचे वाटप करण्यात आले. शिल्पा नारायणकर मॅडम यांनी पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश दिला.
यावेळी ज्येष्ठ शिक्षिका शिल्पा जाधव यांची दुपार सत्र को-ऑर्डिनेटर पदी नेमणूक व व्यवस्थापन समितीवर शिक्षक प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.