जेऊर – करमाळा तालुक्यातील सरपडोह येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील सर्जनशीलता, कल्पकता आणि हस्त कौशल्य विकसित व्हावे या उद्देशाने रंगीबेरंगी दिवे व रंगीबेरंगी आकाश कंदील कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होत उस्फूर्त प्रतिसाद दिला व त्यांच्या कल्पकतेतून सुंदर असे आकाश कंदील तयार केले.
मुख्याध्यापक श्री माळी सर यांच्या मार्गदर्शनाखाली सौ.वनवे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना रंगीबेरंगी दिवे आणि रंगीत आकाश कंदील तयार करण्याच्या तंत्राचे मार्गदर्शन केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वनिर्मितीचा आनंद,आत्मविश्वास, कलात्मक दृष्टिकोन आणि कृतीतून शिकण्याची वृत्ती विकसित होण्यास मदत होऊन विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे सुंदर दर्शन घडते. तसेच अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन मिळत असल्याचे मत मुख्याध्यापक माळी सर यांनी व्यक्त केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सौ बडे मॅडम,वनवे मॅडम,पाटील मॅडम लोकरे सर आधी सहशिक्षकांनी विशेष असे परिश्रम घेतले.
Views: 10