मंगळवेढा – मंगळवेढा शहर परिसरातून एका २७ वर्षीय विवाहित महिलेस फूस लावुन पळवुन नेन्याचा प्रकार घडला आसुन या प्रकरणी पतीच्या फिर्यादीवरून मंगळवेढा पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, दि. ४ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास फिर्यादी पती हे मुलांना ट्युशनवरून घरी घेऊन येण्यासाठी गेले बाहेर गेले होते. त्यावेळी पत्नी घरातच होती. सायंकाळी ७ वाजता घरी परत आले असता पत्नी घरात दिसली नाही. आजूबाजूला शोध घेतला, तसेच नातेवाईकांकडे – नंदेश्वर, महमदाबाद शेटफळ, मेथवडे, मांजरी, तासगाव येथेही शोध घेतला असता ती मिळून आली नाही.
कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे. याप्रकरणी मंगळवेढा पोलिसांनी BNS कलम १४०(३) अन्वये आज्ञाता विरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पो.हे.कॉ. कांबळे हे करीत आहे.
————–__
Views: 10