सांगोला – महाराष्ट्र राज्य जि.प.म.न.पा.सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघ या संघटनेची दि.२५ नोव्हेंबर रोजी ऋणानुबंध हॉल, मंत्रालयासमोर, मुंबई या ठिकाणी राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठकीमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांचे प्रश्न व अडचणी यावर चर्चा होणार आहे. तसेच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून ७५ वर्षे पूर्ण झालेल्या एका शिक्षकाचा अमृतमहोत्सवी सत्काराचे नियोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमासाठी शिक्षणमंत्री, राज्य शिक्षण मंत्री तसेच संघाचे पदाधिकारी व सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. यासाठी सांगोला तालुका प्राथमिक शिक्षक पेन्शनर संघटनेचे संचालक शंकरराव सावंत यांची सोलापूर जिल्ह्यातून निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
Views: 13