Saturday, November 7, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मंगळवेढा पोलिसांच्या महिला समुपदेशन केंद्राची कामगिरी; ३०० पैकी २५० तुटणारे संसार वाचवले

तरुण भारतbyतरुण भारत
November 7, 2026
in social
0
मंगळवेढा पोलिसांच्या महिला समुपदेशन केंद्राची कामगिरी; ३०० पैकी २५० तुटणारे संसार वाचवले
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
मंगळवेढा –  मंगळवेढा पोलीस ठाण्यात महिला व बाल विकास विभागाकडून सुरू असलेल्या महिला समुपदेशन केंद्राने यंदा उल्लेखनीय कामगिरी केली आहे. चालू वर्षी प्राप्त झालेल्या ३०० कौटुंबिक तक्रारींपैकी तब्बल २५० तुटलेल्या संसारांचा समझोता घडवून पुन्हा नव्याने संसाराचा गाडा उभा करण्यात केंद्राला यश आले आहे.
पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील दोन महिला अधिकाऱ्यांनी पती-पत्नींना प्रत्यक्ष बोलावून भांडणाच्या मूळाशी जाऊन संसार तुटण्याचे नेमके कारण शोधून त्यांच्या मनाचे परिवर्तन घडवले. त्यामुळे विस्कटलेली कुटुंबे पुन्हा एकत्र आली असून सध्या ही जोडपी सुखाने आणि आनंदी वातावरणात संसार करीत आहेत.
*मोबाईल ठरतोय संसार मोडण्याचे कारण*
सध्याचा जमाना व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्रामचा असल्याने प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. अनेक तक्रारींवरून असे निदर्शनास आले की, पत्नी मोबाईलवरून वारंवार कोणाबरोबर बोलते, या संशयावरून अनेकांचे संसार मोडले आहेत. मोबाईल हा अनेकांचे संसार मोडण्यास कारणीभूत होत असल्याचे समुपदेशनातून समोर आले आहे.
याशिवाय विवाहबाह्य संबंध, पहिला विवाह लपवून दुसरा विवाह करून फसवणूक करणे, घराकडे पुरुषांचे दुर्लक्ष, आर्थिक अस्थिरता, दारूचे व्यसन आदी कारणांमुळेही अनेक तक्रारी समुपदेशन केंद्राकडे आल्या होत्या.
संसार हा आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा असून पती-पत्नीने एकमेकांकडे संशयाने न पाहता मोठ्या मनाने संसार कसा टिकेल याचा विचार करावा, असे आवाहन समुपदेशन केंद्राकडून करण्यात आले आहे.
*फोटो ओळ -* मंगळवेढा पोलीस ठाण्यात तक्रार निवारणासाठी असलेले महिला समुपदेशन केंद्र.
Views: 7
Previous Post

सोलापूर शहर मोफत बससेवेचे मॉडेल बनवणार राजेंद्र मदने

Next Post

मंगळवेढ्यातून २७ वर्षीय विवाहितेस आज्ञाताने पळवुन नेले, अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

मंगळवेढ्यातून २७ वर्षीय विवाहितेस आज्ञाताने पळवुन नेले, अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

दोन्ही पक्षांच्या वरिष्ठांनी संबंधितांना समज द्यावी : आमदार सुभाष देशमुख

November 7, 2026
धनत्रयोदशीच्या निमित्ताने चंद्रभागा तीर लक्ष लक्ष दीपांनी उजळला!

धनत्रयोदशीच्या निमित्ताने चंद्रभागा तीर लक्ष लक्ष दीपांनी उजळला!

November 7, 2026

उजनीच्या पाण्याचा फटका दक्षिण सोलापूरला बसू नये यासाठी आमदार सुभाष देशमुखांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा

November 7, 2026
मंदिर समिती कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणामुळे भाविकाची हरवलेली पर्स सुखरूप परत

मंदिर समिती कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणामुळे भाविकाची हरवलेली पर्स सुखरूप परत

November 7, 2026
दीपावली निमित्त श्री विठ्ठलास  व रूक्मिणी मातेस अलंकार परिधान,

दीपावली निमित्त श्री विठ्ठलास व रूक्मिणी मातेस अलंकार परिधान,

November 7, 2026
पंढरपूर कॉरिडॉर विरोधात बाधित नागरिक न्यायालयात जाण्याबाबत चर्चा सुरू

पंढरपूर कॉरिडॉर विरोधात बाधित नागरिक न्यायालयात जाण्याबाबत चर्चा सुरू

November 7, 2026
दिवाळी लक्ष्मीपूजनानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या अन्नछत्रास किराणा साहित्याची देणगी

दिवाळी लक्ष्मीपूजनानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या अन्नछत्रास किराणा साहित्याची देणगी

November 7, 2026
दुष्काळात गरजू रुग्णांना मोफत, अल्पदरात उपचार द्यावेत-आ.डॉ.बाबासाहेब देशमुख

दुष्काळात गरजू रुग्णांना मोफत, अल्पदरात उपचार द्यावेत-आ.डॉ.बाबासाहेब देशमुख

November 7, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1474924

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!