बार्शी – क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या २३२ व्या जयंतीनिमित्त लहुजी ग्रुपच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला समाजातील नागरिक, युवक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात तब्बल ७५ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करुन क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले.
रक्तदान हेच श्रेष्ठ दान या सामाजिक भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला समाजातील विविध स्तरांतून भरभरुन प्रतिसाद मिळाला. रक्तदात्यांनी रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जपली. तसेच या स्तुत्य उपक्रमाबद्दल लहुजी ग्रुपचे आभार मानले. या प्रसंगी लहुजी ग्रुपचे सदस्य सतीश (पप्पू) हनुमंते (कृषी बाजार समिती सदस्य), ज्योतिर्लिंग बाप्पा कसबे (नगरसेवक), नाथा मोहिते (नगरसेवक), योगेश लोंढे, आशिष भाऊ शिंदे, आनंद चांदणे, भास्कर बगाडे, दास पवार, सुनील चव्हाण, रोहित अवघडे, मिलिंद भालेराव, अभिषेक माने, कुणाल खंदारे, आनंद डोलारे, अभी लोंढे, प्रमोद कांबळे, शेखर कसबे यांच्यासह इतर समाजसेवक, कार्यकर्ते व ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांचे, सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचे आणि कार्यकर्त्यांचे लहुजी ग्रुपच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले.
Views: 13