बार्शी – ‘मराठी भाषेच्या दिव्यात साहित्यिक प्रगल्भ विचारांचे तेल टाकतात आणि साहित्यिक अभिव्यक्ती, कृती मराठी भाषेची गौरवशाली समृद्धी वाढविते’, असे भावसूचक प्रतिपादन साहित्यिक, कवी, गीतकार प्रवीण दवणे यांनी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा बार्शी यांचेवतीने यशवंत सभागृह येथे दि. १५ नोव्हेंबर रोजी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शाहीर अमर शेख साहित्य पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले.
या कार्यक्रमचे अध्यक्षस्थानी स्वेरी पंढरपूरचे संस्थापक प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे हे होते.
पुढे बोलताना श्री. दवणे म्हणाले की, ‘मराठी साहित्यातील भाव भावना यांचे असे महान सामर्थ आहे की, ते अनुवादीत करता येत नाही, अंगाई गीते, आरत्या, लोकवांगमय यांचे अनुवाद तुम्ही कसे करणार?
मराठी भाषा अनेक महान संतांनी समृद्ध केली आहे.
सध्या भाषीक अभिसरणाचं युग आहे, शब्द्धांचे आत्मगन्ध धगधगताहेत.ही क्रांती नाही तर करुणा -संवेदना यांचे अभावाचा सूचक संदेश आहे.
व्यासपीठावर श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, खजिनदार जयकुमार शितोळे, म.सा.प.शाखा अध्यक्ष पां. न. निपाणीकर, प्रा. प्रमिला देशमुख, पुरस्कार प्राप्त साहित्यिक मनोहर मंडवाले (ससर कांदबरी) कल्याण, रावसाहेब पुजारी ‘ (कातर बोणं, कांदबरी) शिरोळ, कवी अरविंद भांबरे (शापित कोलहलांचे नोंदी काव्यसंग्रह) शिरपूर धुळे, कवयीत्री सौ. वर्षा चौबे (काव्यसंग्रह) उसवंलेलं शिवता येईल काय? पुणे ‘सारे काही तुझ्यासंसाठी काव्य संग्रह,’ कवयित्री डॉ. सविता शेट्टी गडहिंग्लज हे विराजमान होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निपाणीकर यांनी केले.
या कार्यक्रमांतर्गत परीक्षक प्रा. प्रमिला देशमुख, प्रा. डॉ. रविकांत शिंदे, प्रा. डॉ. रविराज फुरडे आणि सौ. सुमन चंद्रशेखर यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
पुरस्कार प्रायोजक श्री. जयकुमार शितोळे, सौ. सुवर्णा शिवपुरे, प्राचार्य डॉ. सुग्रीव गोरे श्रीमती शारदा पानगांवकर श्री. सुधाकर कांबळे यांचा कार्यक्रमात मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमांतर्गत साहित्यिक आणि कवी प्रकाश गव्हाणे लिखित ‘खेळ सारा स्वार्थाचा’ या चारोळी संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
कार्यकर्माचे सूत्रसंचाल नीता देव यांनी तर आभार प्रदर्शन बी. आर. देशमुख यांनी केले.
हा पुरस्कार समारंभ यशवी करण्यासाठी सर्वश्री. दिलीप कल्याणी, आबासाहेब घावटे, गिरीष सोनार, कु. मंगल माळी, सौ. सुवर्णा शिवपुरे, सिद्धेश्वर धुमाळ, प्रकाश महामुनी, प्रा. कल्याण घळके, प्रदीप गव्हाणे, प्रदीप कांदे, कु. मयुरी बाबर हरिभाऊ कोळेकर, सौ. सुमन चंद्रशेखर, श्रीमती शारदा पानगावकर, अनिल जाधव आणि राजेंद्र सिंगण यांनी परिश्रम घेतले.
Views: 8