सांगोला – सांगोला महाविद्यालयात भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची १०९ वी जयंती व त्यानिमित्त राष्ट्रीय एकात्मता दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्र.प्राचार्य डॉ.सुरेश भोसले यांच्या हस्ते इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी इंदिरा गांधी यांच्या जीवनकार्याचे स्मरण करून त्यांनी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून बजावलेल्या भूमिकेचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्र.कार्यालयीन अधिक्षक विलास माने यांच्या मार्गदर्शनाखाली जयंती व पुण्यतिथी उपक्रम आयोजन समितीचे प्रमुख डॉ.जमीर तांबोळी, प्रशासकीय कर्मचारी बापू इंगोले, शंकर माने यांनी परिश्रम घेतले.
Views: 11