सोलापूर : ‘बाबासाहेब आंबेडकर एंटरप्रेन्युअर्स अँड सोशल इन्फ्लुएन्सर्स कल्चरल सोसायटी’ (बेसिक्स) यांच्या वतीने मंगळवार, २४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता सम्राट चौकातील एस.ई.एस. पॉलिटेक्निक येथे हे शिबिर होणार आहे. बीकेएसचे राष्ट्रीय अध्यक्ष डी. आर. ओहोळ यांची प्रमुख उपस्थिती असून ते मार्गदर्शन करणार आहेत.
सोशल मीडियावरून प्रसारित होणाऱ्या अर्धवट माहिती आणि अफवांच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक तथ्यांची पडताळणी करून आंबेडकरी विचारांचा जागर नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने सोलापुरात एकदिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘जेन झी’, ‘जेन अल्फा’ आणि ‘मिलेनियल’ अशा विविध पिढ्यांमधील वैचारिक संवादाची दरी कमी करून आंबेडकरी विचार अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यावर शिबिरात भर दिला जाणार आहे. सोशल मीडियावरील माहितीची सत्यता तपासणे, चळवळीचा इतिहास आणि वर्तमानातील वैचारिक दिशा समजून घेणे, बौद्ध धम्म संस्कार, निर्णयक्षमता आणि व्यक्तिमत्त्व विकास या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. या शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन अनुराग सुतकर आणि मितेश काळे यांनी केले आहे.
Views: 23