अक्कलकोट – श्री स्वामी समर्थांचे मुळस्थान असलेल्या येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात येऊन श्री स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होणे हे माझे भाग्य आहे असे मनोगत महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी व्यक्त केले.
ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास भेट देवून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी
मंदिर समितीच्या वतीने चेअरमन व नगरसेवक महेश मालक इंगळे यांच्या हस्ते माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद व प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी या सत्कार सोहळ्यास संबोधीत करताना माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी वरील भावोद्गार काढले.
पुढे बोलताना मा.गृहराज्यमंत्री रमेश बागवे म्हणाले की भुतकाळात स्वामींच्या कृपेने मला जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली याबद्दल मी स्वतःला धन्य समजतो. स्वामींनी ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ हा जो विश्वास दिला तोच विश्वास घेऊन आम्ही सर्वसामान्य जनतेच्या सेवेत काम करत आलो आहोत. देवस्थानच्या हितार्थ व येथे येणाऱ्या भाविकांच्या सोयी सुविधांसाठी शासनाकडून जे काही करता येईल ते करण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन. मंदिर समितीने जो सन्मान केला तो माझा नसून माझ्यावर असलेल्या स्वामींच्या कृपेचा आणि जनतेच्या प्रेमाचा सन्मान आहे. मी मंदिर समितीचे चेअरमन महेश मालक इंगळे व सर्व विश्वस्तांचे मनापासून आभार मानतो.
श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद सर्वांवर सदैव राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना असल्याचे मनोगतही व्यक्त केले.
यावेळी वसंत देडे, श्रीशैल गवंडी, व्यंकटेश पुजारी, श्रीपाद सरदेशमुख आदींसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Views: 154