सोलापूर – स्वाभिमानी सहकारी शेतकरी पॅनलची बैठक ऐश्वर्या हॉटेल येथे रविवारी सायंकाळी घेण्यात आली होती. त्यावेळी रंजितसिंह मोहीते पाटील यांनी विरोधकांच्या टिकेला उत्तर देत कुठली संस्था मोहीते पाटलांनी बुडवली, माझ्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एक रुपयाचं सुद्धा कर्ज माझ्या कुठल्याही खाजगी संस्थाना दिलेलं नसल्याचे बैठकीत सांगितले.
निवडणूक लागल्यानंतर विरोधकांकडून रणजित सिंह मोहिते पाटील यांच्या वर टीका केली जात होती. त्याला उत्तर देत जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक ही कोणाची प्रतिष्ठान कमी करण्यासाठी किंवा वाढण्यासाठी नसल्याचे रंजितसिंह मोहिते पाटील यांनी बैठकीतील भाषनादरम्यान सांगितले. बैठकीमध्ये एकच शिट्टी चा घुमू लागला होता. कारण स्वाभिमानी सहकार शेतकरी पॅनलचे चिन्ह हे शिट्टी आहे. प्रत्येकाचे भाषण झाल्यानंतर टाळ्यांऐवजी शिट्टी वाजली जात होती. यावेळी खा. धैर्यशील मोहीते पाटील सर्व उमेदवार, सर्व पक्षीय नेते उपस्थित होते.
यावेळी उमेदवार अमोल शिंदे, अस्मिता गायकवाड, अमित देशमुख व इतर पक्षातील नेते चेतन नरोटे, प्रताप चव्हाण, महेश गाडेकर, आरिफ शेख आदी जणांनी आपले मनोगत व्यक्त केले.























