Tuesday, November 24, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोलापूर जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी फुटली. माजी खासदार राजु शेट्टी यांचे पुन्हा एकदा विठुरायाने गार्हाणे ऐकले

तरुण भारतbyतरुण भारत
November 23, 2026
in west maharashtra
0
सोलापूर जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी फुटली. माजी खासदार राजु शेट्टी यांचे पुन्हा एकदा विठुरायाने गार्हाणे ऐकले
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पंढरपूर – सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसदराचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. शेतकरी संघटनेची जरी ३ हजार ५०० रुपयांची मागणी असली तरी सोलापूर जिल्ह्यातील प्राप्त परिस्थिती लक्षात घेता कुठेतरी मार्ग काढण्याची गरज होती. त्या प्रमाणे जे मिळणारच नाही म्हणत होते त्यांना आंदोलनापुढे नमवून ३ हजार ४५० रुपयांवर राजी करण्यात शेतकरी संघटनांना यश आल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्ह्यातील प्रमुख नेते सचिन पाटील यांनी दिली.
या बरोबरच माजी खासदार राजु शेट्टी यांनी ज्या ज्या वेळी श्री विठ्ठलाला साकडे घातले त्या त्या वेळी श्री विठ्ठल शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आला आहे. या वेळी दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकरी खरोखरच हवालदिल झाल होता. मात्र याही परिस्थितीत शेतकरी संघटनेच्या पाठीमागे तो ठामपणे उभा राहिला तो केवळ श्री विठ्ठलाच्या कृपेमुळेच आणि संघटना दर मिळवून देणार या भऱोशावरच. त्यामुळे याही वेळी माजी खासदार राजु शेट्टी यांनी विठुरायाला घातलेले साकडे पुर्णत्वास गेल्याचे सचिन पाटील यांनी सांगितले.
कोल्हापूर जिल्ह्याच्या उस दराचा कांडका पाडल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख तथा माजी खासदार राजु शेट्टी यांनी आपला मोर्चा सोलापूर जिल्ह्याकडे वळविला होता. राज्याच्या विचार करता जिल्ह्यातील सर्वात जास्त साखर कारखान्याचा जिल्हा म्हणून सोलापूर जिल्ह्याचा नावलौकीक आहे. मात्र तेथील कारखानदार शेतकरी सभासदांना म्हणावा तसा दर देत नाहीत. त्यामुळे या वर्षी आम्ही ३ हजार ५०० रुपये दर घेणारच म्हणत पंढरपूरच्या विठुरायाला साकडे घालून सोलापूरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन केलेले होते.
त्यावेळी कारखानदारांना ३ हजार ५०० दर घेतल्या शिवाय कारखाने सुरु करु दिले जाणार नाहीत असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आले होते. त्या नंतर पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र त्या मध्ये देखील तोडगा निघाला नाही. त्यावेळी कारखानदारांच्या ताठर भूमिकेमुळे बोलणी फिस्कटली. त्या नंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवसांची मूदतीत कारखानदारांनी आपली भूमिका स्प्षट् करावी तो पर्यंत उसतोड थांबवून कारखाने बंद ठेवण्याचे आवाहन केले.
दरम्यान साखर कारखानदारांकडून कोणताच प्रस्ताव येत नसल्याने शेतकरी संघटनांचे पदाधिकारी देखील आक्रमक झाले. त्यांनी सोलापूर कडे येणारे सर्व महामार्ग रोखून धरण्याचा इशारा दिला. या बरोबरच जे कारखाने सुरु होते त्यांची वाहने रोखून धरली. मात्र जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्र्यांनी केलेल्या आवाहना नुसार माढ्यातील विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना, श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखाना आणि गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखाना तसेच मोहोळ येथील राजन पाटील यांच्या कारखाना तसेच अकलुजचे बाळदादा मोहिते पाटील यांच्या मध्ये शनिवारी दरा संदर्भात बैठक झाली. अखेर वरील कारखान्याच्या कारखानदारांनी पुढाकार घेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला प्रस्तावाला संमती दिली.
दरम्यान या चर्चेसाठी रविवारी पंढरपूरातील विश्रामगृहा मध्ये पांडुरंग कारखान्याचे कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी तसेच इतर कारखान्यांच्या अधिकाऱ्यांनी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन दरा संदर्भात संघटनेला तसेच जिल्हाधिकाऱ्यांना देखील मंजुरी संदर्भातील पत्र दिले. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे येथील पदाधिकारी सचिन पाटील, दीपक भोसले, समाधान फाटे, तानाजी बागल आदींसह संघटनेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून एकच जल्लोष केला.
——————-
चौकट : ( जिल्ह्यातील उसदराचा असा ठरला फाँर्म्युला )
पहिली उचल प्रतिटन ३  हजार २५० रुपये, त्यानंतर  कारखाना बंद होताना शंभर रुपयां प्रमाणे एक हप्ता तसेच दीवाळी सणासाठी १०० रुपये हप्ता देवून साधारणपणे एकुण ३ हजार ४५० रुपये प्रतिटन दर दिला जाणार. दरम्यान शेतकरी संघटनेच्या ३ हजार ५०० रुपयांच्या मागणीवर देखील ज्यावेळी साखरेचे दर ४५ रुपयांच्या पुढे जातील त्यावेळी ७० : ३० फाँम्युर्ला नुसार संघटनांनी उरलेला दर शेतकऱ्यांना देण्या संदर्भात कारखानदारांकडून लेखी हमी घेतल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सचिन पाटील यांनी सांगितले.
——————-
चौकट : ( जिल्हाधिकाऱ्यांनी बजावली महत्वाची भूमिका )
ऊसदरावरून निर्माण झालेला तणाव लक्षात घेऊन जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी महत्वाची भूमिका बाजवली. त्यांनी संघटना आणि कारखानदार यांच्या मध्ये  मध्यस्थी केली. कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यात तोडगा निघावा, यासाठी त्यांनी कारखानदारां समोर टप्प्याटप्प्याने ऊसदर देण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यावर चर्चा होवून चर्चेअंती मार्ग निघून दर निश्चित होवून दराचा कांडका पडला.
———————–
चौकट : ( कारखानदारांकडून जिल्हाधिकाऱ्यांना लेखी आश्वासन) जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिलेला प्रस्ताव मान्य करत सोलापूर जिल्ह्यातील माजी आमदार बबनदादा शिंदे यांचा विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा पांडुरंग सहकारी साखर कारखाना. आमदार अभिजित पाटील यांचा विठ्ठल सहकारी साखर कारखाना. या कारखान्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला लेखी पत्र देण्यात आलेले आहे.
—————–
चौकट : ( ऊस परजिल्ह्यात जाऊ लागल्याने कारखानदार नरमले )
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उस दराच्या आंदोलना बरोबरच बाहेरील जिल्ह्यातील कारखानदारांना जिल्ह्यातील उस नेण्यासाठी पाचारण केले. त्या प्रमाणे पंढरपूर तालुक्यातून तसेच इतर ठिकाणाहून कर्नाटक तसेच परजिल्ह्यातील तोडणी मजूर येवून ते येथील ऊस बाहेर घेऊन जावु लागले. त्यामुळे यंदा उसाची टंचाई असल्यामुळे आपल्या कारखान्यांना पुन्हा अडचण येणार म्हणून कारखानदारांनी दोन पावले मागे जात उसदरावर तोडगा काढला )
———————
चौकट : (मयत कार्यकर्त्यांला मदतीचे आवाहन )
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सोलापूर येथील मोर्चात सहभागी होवून घरी परत गेलेल्या शेतकरी संघटनेचा पदाधिकारी कार्यकर्ता असलेला सोमनाथ शेळके या शेतकऱ्यांचे त्याच रात्री हदयविकारने निधन झाले. त्यामुळे शासना बरोबरच सोलापूर जिल्ह्यातील सर्व कारखानदारांनी आपआपल्या परिने कारखान्याच्या वतीने या कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे येथील नेते सचिन पाटील यांनी केले आहे.
————————-
कोट
शेतकरी संघटनेच्या या उस आंदोलनात सहभागी झालेल्या कोणत्याही शेतकरी तसेच पदाधिकाऱ्यांना आंदोलनात सहभागी झाला म्हणून जर जिल्ह्यातील कोणत्याही कारखानदारांनी त्रास देवून त्यांचा उस शेतात ठेवला तर संबंधित कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल हा आमचा इशारा आहे.
Views: 24
Previous Post

आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या मागणीला यश

Next Post

रामायणातील व्यक्तीरेखांची मोडतोड आणि रावणाचे उदात्तीकरण हिंदू समाज कदापि सहन करणार नाही !

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
रामायणातील व्यक्तीरेखांची मोडतोड आणि रावणाचे उदात्तीकरण हिंदू समाज कदापि सहन करणार नाही !

रामायणातील व्यक्तीरेखांची मोडतोड आणि रावणाचे उदात्तीकरण हिंदू समाज कदापि सहन करणार नाही !

ताज्या बातम्या

पद्मश्री उदय देशपांडे यांच्याकडून सोलापुरात मल्लखांब जागृती

पद्मश्री उदय देशपांडे यांच्याकडून सोलापुरात मल्लखांब जागृती

November 24, 2026
धाराशिवच्या ३ लाख ५७ हजार सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ६०३ कोटींची नुकसानभरपाई मिळवून दिली

धाराशिवच्या ३ लाख ५७ हजार सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ६०३ कोटींची नुकसानभरपाई मिळवून दिली

November 24, 2026
मोटार चालकाने दुचाकी स्वारांना उडवले; दोघांचा मृत्यू

मोटार चालकाने दुचाकी स्वारांना उडवले; दोघांचा मृत्यू

November 24, 2026
पंढरपूर नगरपरिषदेच्या भोंगळ कारभाराविरोधात युवक काँग्रेसचे हलगी नाद आंदोलन

पंढरपूर नगरपरिषदेच्या भोंगळ कारभाराविरोधात युवक काँग्रेसचे हलगी नाद आंदोलन

November 24, 2026
हिंगलाजमाता हॉस्पिटल येथे उभारणार १५० खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय

हिंगलाजमाता हॉस्पिटल येथे उभारणार १५० खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय

November 24, 2026

जुन्या जन्म-मृत्यू नोंदींचे डिजिटायझेशन कासवगतीने!

November 24, 2026

अखेर सहायक अभियंता कोंडगुळे यांचे पदभार काढण्याचे आदेश; सीईओंकडून दैनिक तरुण भारतच्या वृत्ताची दखल

November 24, 2026
उजनी धरण परिसरात एआय डेटा सेंटर प्रकल्प होऊ देणार नाही!

उजनी धरण परिसरात एआय डेटा सेंटर प्रकल्प होऊ देणार नाही!

November 24, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1557805

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!