माळशिरस ….. चारचाकी टाटा पंच व दुचाकीचीच्या अपघातात मोटार सायकलवरील दोघे ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना वेळापूर सांगोला रोडवर मळोली गावाच्या हद्दीत भाऊसोजाधव यांच्या घराजवळ सकाळी १० .४५ सुमारास घडली .रोहन गणपत जाधव (वय २४ वर्षे)व मयूर सुखदेव शिंदे (वय २४ वर्षे ) दोघेही राहणार मळोली अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.तर सागर तुळशीराम मगर (वय २५ )राहणार निमगाव हा गंभीर जखमी झाला असून त्यास उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले असून याबाबत चार चाकी चालक संजय नामदेव बडेकर (रा केसकर पेठ ,सातारा ) याचे विरोधात वेळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी कि रोहन जाधव ,मयूर शिंदे व सागर मगर हे मोटार सायकल क्रमांक एम एच ४५ एएच ४३३८ या दुचाकी वरून मळोली कडे चालले असता समोरून मळोली कडून येणाऱ्या टाटा पंच क्रमांक एम एच ११ डीझेड २१७२ या चाकी वाहनाने मळोली गावाच्या हद्दीत भाऊसोजाधव यांच्या घरा नजीक जोरात धडक दिली यामध्ये दुचाकी वरील तिघे तरुण उडून पडले यामध्ये रोहन जाधव ,मयूर शिंदे या दोघांच्या डोक्यास जबर मार लागला तर सागर मगर हात पायास व डोक्यास मार लागला या तिघांना अकलूज येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले यावेळी डॉक्टरांनी रोहन जाधव ,मयूर शिंदे हे उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले तर सागर मगर यास उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.याबाबत रोहन जाधव याचे चुलते श्रीपती शामराव जाधव यांनी चारचाकी चालक संजय नामदेव बडेकर याचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.























