सांगोला – भारतीय संविधानाच्या ७७ व्या संविधान दिनाचे औचित्य साधून तसेच देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शहिदांच्या स्मरणार्थ शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेच्यावतीने शहीद दिनानिमित्त गुरुवार दि.२६ नोव्हेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या शिबिराचे १८ वे वर्ष असून गुरुवार दि.२६ नोव्हेंबर रोजी स.८ ते सायं.५ वा.पर्यंत स्टेशन रोड, विटा बँकेजवळ, सांगोला या ठिकाणी होणार आहे. संविधानाने दिलेली समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि न्याय ही मूल्ये जपत प्रत्येक नागरिकाने सामाजिक कार्यात सहभागी होणे गरजेचे आहे. शहिदांच्या स्मरणार्थ रक्तदान करून त्यांना खरी आदरांजली वाहण्याची ही एक संधी आहे. तरी सांगोला शहर व तालुक्यातील सर्व युवक, युवती, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिकांनी या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.