बार्शी – घरी आई-वडिलांना घेऊन यायचे नाही, असे म्हणत एका महिलेला काठीने मारहाण करुन शिवीगाळ केल्याची घटना सुर्डी (ता. बार्शी) येथे घडली. तसेच कुऱ्हाड व कोयत्याने मारहाण करण्याची आणि जिवंत सोडणार नसल्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांविरुद्ध बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनीता मिठू पवार (वय ४५, रा. सुर्डी) यांच्या फिर्यादीवरुन अनिल मोहन काळे, अश्विनी अनिल काळे आणि साहिल अनिल काळे (सर्व रा. सुर्डी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. फिर्यादी सुनीता पवार यांच्या घरासमोर हा प्रकार घडला. आरोपींनी फिर्यादीच्या घरासमोर येऊन, ‘माझ्या घरी आई-वडिलांना घेऊन यायचे नाही,’ असे म्हणत त्यांना काठीने मारहाण केली. याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.