सोलापूर :अतिशय क्षेत्र चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन कासार मंदिर ट्रस्ट सोलापूर येथील श्रीमज्जिनेन्द्र 1008 पार्श्वनाथ जिनबिंब पंचकल्याणक व मानस्तंभ प्रतिष्ठान महामहोत्सव कार्यक्रमाला अथर्व गार्डन(वाराणसी नगरी) जोडभावीपेठ पोलीस स्टेशन जवळ येथे108 श्री सुप्रभ सागर जी महाराज, प्रणत सागर , पूराण सागर,105 क्षुल्लक विप्रज्ञसागर महाराज,बा. ब्र .साकेत भैय्याजी,पंडित प्रशांत मोहरे,पंडित मुकेश शास्त्री व पंडित अखिलेश शास्त्री,गायक मयंक भैय्या यांच्या मार्गदर्शन आणि पावन सानीध्यामध्ये दिनांक 20, 21 नोव्हेंबर रोजी गर्भ कल्याणक,22 नोव्हेंबर रोजी जन्म कल्याण महोत्सव संपन्न होत आहे.यामध्ये सकाळी मंगल वाद्य जिनाभिषेक शांतीधारा सकलीकरण इंद्रप्रतिष्ठा वजीरदिक्षा मंगल कलश अखंड ज्योति स्थापना जाप्य, गर्भ संस्कार व जन्म संस्कार तीर्थंकर बालकाच्या जन्माची घोषणा सौधर्म इंद्र दरबार, चढावा, बोलीकार्यक्रम तसेच सायंकाळी आनंदनृत्य संस्कृतीक कार्यक्रम, तिर्थंकर बालकाचा पाळणा, संम्यक समाधान कार्यक्रम घेण्यात आले.कार्यक्रमासाठी भव्य पेंडॉल ,उत्कृष्ट भोजन व्यवस्था करण्यात आली आहे.यासाठी अध्यक्ष संजय कंदले ,विलास कंदले,रवी किरण मैंदर्गे,अभिनव विभुते,सुदर्शन वनकुद्रे,कांतीलाल नळे, उमेश सगर शेट्टी ,महेश नळे,मोहन डांगरे डॉ. बिराजदार, चेतन वनकुद्रे यांनी विशेष परिश्रम घेतले आहे. आज कार्यक्रमात स्पेशल डिस्ट्रिक्ट कोर्ट जज अजित भस्मे उपस्थित होते.उत्कर्ष समूह भारत यांच्यातर्फे परमपूज्य भट्टाचार्य 108 विशुद्ध सागर महाराज यांच्या36 व्या मुनी दीक्षा दिनानिमित्त उत्कृष्ट संघपती, मुनी सेवा केल्याबद्दल साहिल अजित शहा (भुमकर), पावस योग समितीचे अध्यक्ष संजोग गांधी यांचा प्रभावना पुरुषोत्तम उपाधी पट्टाचार्य विशुद्ध सागर जी राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला,पंढरपूरचे बालब्रह्मचारी प्रितेश कोठारी यांना परमपूज्य मुनी 108 सुप्रभ सागर जी महाराज यांच्या प्रेरणेने जैन गौरव उपाधी गणाचार्य विराज सागर जी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला,कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी वालचंद शिक्षण समूहाचे सर्वेसर्वा श्रीमान अरविंद दोशी,ललितपुर चे डॉ . सुनील संचय जैन,उज्जैन येथील सौरभ कासलीवाल इत्यादी मान्यवर उपस्थित होते.परमपूज्य 108 सुप्रभ सागर महाराजांचे गुरु परमपूज्य पट्टाचार्य 108 विशुद्ध सागर महाराज असल्याने,सुप्रोप सागर महाराजांनी प्रवचनांमध्ये *मै गुरु के उपकार को उपहार माननेवाला सच्चा शिश्य हुं* सोलापुरातील धर्मानुरागी नूतन गांधी, संतोष शहा, राजकुमार दोशी यांचे मुनी सेवेत आहार ,विहार मध्ये योगदानाबद्दल विशेष कौतुक केले.*इंसान को धर्म धर्मात्मा जीव को जोडने की जरूरत है, बुजुर्ग ,इमारत, मंदिर की रक्षा के साथ युवा पिढी उनकी रक्षा का भी ध्यान दो , जेनझी, जेन अल्फा इनको धर्म की ओर आकर्षित करो,नित्य देव, शास्त्र ,गुरु की पूजा करो* असे प्रवचनात सांगितले.अथर्व गार्डन जोडभावी पोलीस चौकी सोलापूर येथे कासार मंदिर ट्रस्ट टीमने भव्य पेंडॉल, निवास, आवास,भोजन व्यवस्था केली आहे ,मुनी महाराजांची स्वतंत्र व्यवस्था पार्श्वभवन येथे करण्यात आली आहे.
Views: 15