बार्शी – लायन्स क्लब बार्शी रॉयलच्यावतीने वखारिया विद्यालय, उपळे दुमाला (ता. बार्शी) येथे “ध्यान धारणा – चला मन एकाग्र करुया…” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवार, दि. २१ नोव्हेंबर रोजी सकाळी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध योगगुरु वेदपाठक हे उपस्थित होते. तसेच, बार्शी लायन्सचे अध्यक्ष मंगेश बागुल, प्रशालेचे मुख्याध्यापक तथा बार्शी लायन्सचे सचिव दयानंद रेवडकर, क्लबच्या सदस्या सौ. ज्योती रेवडकर आणि सौ. बागुल यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक दयानंद रेवडकर यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनातील एकाग्रतेचे आणि नियमित योगाभ्यासाचे महत्त्व अधोरेखित केले. लायन्स क्लबचे अध्यक्ष बागुल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत क्लबच्या विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. यावेळी प्रशालेच्यावतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
प्रमुख मार्गदर्शक योगगुरू वेदपाठक सर यांनी विद्यार्थ्यांना आणि उपस्थितांना दैनंदिन जीवनातील तणावमुक्तीसाठी योगाचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह योगाचे विविध प्रकार आणि ध्यान धारणेची तंत्रे शिकवली. याप्रसंगी प्रशालेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश लंकेश्वर यांनी तर आभार प्रदर्शन सौ. ज्योती रेवडकर यांनी मानले.
Views: 12