जालना – जालना सहकारी साखर कारखाना रामनगर, चे संस्थापक माजी खा. बाळासाहेब पवार यांच्या 27 व्या पुण्यतिथी निमित्त रामनगर कारखाना परिसरात एका अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. 25 नोव्हें. रोजी स्व. बाळासाहेब पवार यांची 27 वी पुण्यतिथी आहे. 1980 च्या दशकात शेतकऱ्यांना समृद्ध, आर्थिक सक्षम आणि सशक्त करण्याच्या उद्देशाने स्व. बाळासाहेब पवार यांनी या कारखान्याची मुहुर्तमेढ रोवली होती. जालना-बदनापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना संजीवनी देणारा हा कारखाना शेतकऱ्यांसाठी एकमेव आधार होता. अनेक नवयुवक, होतकरू तरुणांच्या हाताला काम देणारा होता. अशा या सहकार महष जालना सहकारी साखर कारखाना रामनगर चे संस्थापक माजी खा. बाळासाहेब पवार यांना दि. 25 नोव्हें. रोजी कारखाना परिसरात सकाळी 10 वा. अभिवादन करण्यासाठी एका सभेचे आयोजन करण्यात आले असून यावेळी शेतकरी नेते लक्ष्मणराव वडले यांचे मार्गदर्शन तसेच स्व. बाळासाहेब पवारांच्या कारकिदतील कार्याच्या आठवणींना उजाळा देण्यात येणार आहे.
या अभीवादन सभेस सर्व कामगार, सभासद, ऊस उत्पादक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन जालना – बदनापूर सहकारी साखर कारखाना बचाव कृती समिती आणि अंजलीताई दमानिया समर्थक यांच्या वतीने अंकुशअप्पा देशमुख, अंकुशराव राऊत, कमलाकर अंभोरे, राजेंद्र जैस्वाल, ज्ञानेश्वर भांदरगे, सुभाषराव कोळकर, लक्ष्मण शिंदे, नारायण वाडेकर, कैलास फुलारी, कॉ. प्रल्हाद हेकाडे, प्रल्हाद पडूळ, कृष्णा पडूळ, कारभारी महाराज अंभोरे, सोपानराव भांदरगे, अरुण वडकर, जगन्नाथ काळे, सांडुराम दाभाडे, चंद्रकांत देशमुख, अर्जुनराव भांदरगे, ज्ञानेश्वर देवडे, मारोतराव मदन, शिवाजी शेजुळ, श्रीराम लकडे, ऍड. गोपाळ मोरे, रावसाहेब पवार, अशोक देशमुख आदिंसह कामगार, सभासद, ऊस उत्पादक यांनी केले.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...





















