पंढरपूर – पंढरपूर येथे भारतीय जनता पार्टी पुरस्कृत ‘सहकार विकास पॅनल’ व मित्रपक्षांच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवारी येथील श्रीराम मंगल कार्यालयात स्नेह मेळावा पार पडला.
या मेळाव्याचे उदघाटन माजी आमदार तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते राजन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार तथा बँकेचे बिनविरोध निवडून आलेले संचालक प्रशांत परिचारक म्हणाले,कर्मयोगी श्रद्धेय मोठ्या मालकांनी सहकाराची जी आदर्श ध्येयधोरणे आखून दिली आहेत, त्यांच्या आशीर्वादाने आणि ‘पांडुरंग परिवाराच्या’ माध्यमातून पंढरपूर तालुक्यातील सहकार संस्था अत्यंत सक्षमपणे कार्यरत आहेत. यापुढेही मोठ्या मालकांच्या विचारांवर चालत या संस्था अधिक बळकट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करून, तालुक्यातील शेतकऱ्यांना वेळेत व पुरेसा आर्थिक पतपुरवठा केला जाईल, अशी देखील ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली व पालकमंत्री जयकुमारजी गोरे यांच्या नेतृत्वाखाली बँकेच्या तब्बल १० जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित ९ जागांवरही सहकार विकास पॅनलचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा ठाम विश्वास व्यक्त देखील यावेळी परिचारक यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी माजी आमदार राजन पाटील व माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनीही उपस्थित मतदारांशी संवाद साधत पॅनलच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सहकार विकास पॅनलचे अधिकृत उमेदवार तसेच भाजपा आणि मित्रपक्षातील मान्यवर तसेच विविध सहकारी संस्थांमधील नेते मंडळी विराजमान झाले होते. या सभेला मोठ्या संख्येने मतदार आणि कार्यकर्ते मंडळी उपस्थित होते.
——————-
चौकट : ( कपबशीला मतदान करण्याचे आवाहन )
सहकार क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सक्षम नेतृत्वाला बळ देण्यासाठी ‘कपबशी’ या निवडणूक चिन्हासमोरील उमेदवारांना आपले बहुमोल मतदानरूपी आशीर्वाद देऊन विजयी करावे, असे देखील आवाहन उपस्थित नेते मंडळींकडून करण्यात आले.
Views: 17