सोलापूर -संशयावरून नवरा – बायकोने एकमेकाला लाथा बुक्क्याने मारहाण केली. यात जखमी झालेल्या वृद्ध नवऱ्याचा उपचारादरम्यान येथील शासकीय रुग्णालयात सोमवारी दुपारी मृत्यू झाला.
पोपट साधू सरवदे (वय 60 वर्ष, रा. खैराव, तालुका माढा) असे मयत नवऱ्याचे नाव आहे तर प्रियंका पोपट सरवदे (वय 54 वर्ष) असे पत्नीचे नाव आहे. वरील दोघेजण रविवारी घरात असताना नवऱ्याने संशय घेऊन पत्नीला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली होती. यावेळी पत्नीने देखील मला सारखे मारहाण का करता असे म्हणून पतीला देखील लाथा बुक्क्यांनी मारहाण केली होती. यात सर्वांगास मुका मार लागल्याने हे दोघेजण माढा येथील आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून येथील शासकीय रुग्णालयात स्वतः दुपारी दाखल झाले होते. उपचारादरम्यान पोपट सरवदे यांचा सोमवारी दुपारी मृत्यू झाला. याबाबत सिविल पोलीस चौकीत नोंद करण्यात आली आहे.
Views: 5