मोहोळ – पंढरपूर मोहोळ पालखी मार्गावर छोटा हत्तीची धडक लागून एकाचा मृत्यू झाला हा अपघात सारोळे गावाजववळ मंगळवारी रात्री साडेसात वजणेच्या सुमारास झाला
देवानंद विठ्ठलराव हुंबे (रा मरसूळ ता उमरखेड ) असे मृताचे नाव आहे.
या संदर्भात मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, देवानंद हुंबे वय ४९ हे रात्री रस्ता ओलांडत असताना भरधाव जाणाऱ्या छोटाहत्ती क्रमांक एम एच १३ सीयु / ७०६२ याने जोरदार धडक दिली. त्यात हुंबे रस्त्यावर पडले. त्यांच्या हाताला व डोक्याला मार लागून ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तपासून त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान अपघात होताच चालक छोटा हत्ती घेऊन पळून गेला. या प्रकरणी अवधूत देवानंद हुंबे वय २२ रा मरसूळ याने मोहोळ पोलिसात फिर्याद दिली असून, छोटा हत्ती चालक रोहित राजशेखर मोदी रा शेळगी जिल्हा सोलापूर याच्या विरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या अपघाताचा तपास अपघात पथकाचे अंमलदार श्री चव्हाण करीत आहेत.
Views: 15