सोलापूर -रोज प्रमाणे दुचाकी वरून कामावर निघालेल्या कर्मचाऱ्याचा मोटार कारच्या धडकेत जागेवर मृत्यू झाल्याची घटना सोलापूर तुळजापूर मार्गावर तामलवाडी येथील बालाजी अमाईन्स कंपनी समोर आज बुधवारी दुपारी तीन वाजता घडली.
यशवंत रामराव पाटील (वय 50 वर्ष, रा. तामलवाडी, तालुका तुळजापूर) असे त्या मयत कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते बालाजी अमाईन्स कंपनीत कामाला होते.रोज प्रमाणे आज बुधवारी दुपारी ते मोटरसायकल वरून तामलवाडी कडून कामावर निघाले असताना दुपारी तीन वाजेच्या सुमारास ते कंपनी समोर आले तेव्हा ते मोटार सायकल कंपनीकडे वळवत असताना पाठीमागून भरधाव आलेल्या मोटार कारणे त्यांना जोराची धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी होऊन जागेवरच बेशुद्ध होऊन पडले. त्यांना मदतनीस सुरज भंते यांनी उपचारासाठी येथील शासकीय रुग्णालयात चार वाजता दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
चौकट – मयत यशवंत पाटील हे मूळ नांदेड जिल्ह्यातील खासगाव दिग्रज येथील रहिवाशी, कामामुळे ते तामलवाडी येथे कुटुंबीयांसह राहण्यास होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, दोन भाऊ, पाच बहिणी असा परिवार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.
Views: 11