बार्शी – येथील कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयात ७७ वा भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला.
प्रथमतः संविधानकार भारतरत्न डॉ.बाबाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. या अनुषंगाने संविधान प्रास्तविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बप्पा सुतार, सतीश पाचकुडवे, नईम शेख मंत्री, शाम जानराव, राहुल लोंढे, हर्षद देशमुखे, आर्यन पोकळे, प्रेम लोंढे यांचेसह सभासद व वाचक उपस्थित होते. यावेळी शहीद दिनानिमित्त शहिदांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार ग्रंथपाल विनोद गायकवाड यांनी व्यक्त केले.
Views: 9