सोलापूर – शेतात काम करताना सर्पदंश झालेल्या पडसाळी गावच्या एका तीस वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान येथील अश्विनी सहकारी रुग्णालयात बुधवारी दुपारी साडेतीन वाजता मृत्यू झाला.
राधिका आप्पासाहेब शिरसट (वय 30 वर्ष, रा. पडसाळी, नान्नज, उत्तर सोलापूर) असे त्या मयत महिलेचे नाव असून त्या 24 नोव्हेंबर रोजी सकाळी पडसाळी गावातील शेतामध्ये काम करीत असताना त्यांना उजव्या पायाला सर्पदंश झाला होता. त्यामुळे त्यांना गावात प्रथम उपचार करून येथील शासकीय रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारासाठी अश्विनी सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र उपचारादरम्यान त्यांचा बुधवारी दुपारी मृत्यू झाला.
Views: 16