अक्कलकोट – महाराष्ट्र शासनाने अक्कलकोट तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले असुन तालुक्यातील अनेक गावांमध्ये जनावरांच्या चाऱ्याचा तसेच पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून शेतकरी देशोधडीला लागले आहे. तरी शासनाकडून अद्याप अक्कलकोट तालुक्यात एकही चारा छावण्या सुरू केले नसल्याने शेतकरी व पशुपालक अडचणीत सापडले आहेत. या पाश्र्वभूमीवर चारा छावण्या सुरू होण्याची वाट न पाहता दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात चाऱ्यासाठी थेट आर्थिक मदत जमा करावी अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्याचे माजी मंत्री महादेव जानकर यांनी केली आहे. पक्षाचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्तात्रय माडकर यांनीही शासनाने तातडीने निर्णय घेऊन शेतकरी व पशुपालक यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे. जनावरांचे संगोपन आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी थेट मदत देणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Views: 17