सांगोला – सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज येथे भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा.धनाजी चव्हाण यांनी भारतीय संविधान हे केवळ कायद्याचे किंवा प्रशासकीय नियमांचे पुस्तक नसून देशाच्या विविधतेला एका सूत्रात बांधणारा लोकशाहीचा जिवंत प्राण असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी प्राचार्य चारुदत्त जगताप, उपमुख्याध्यापक प्रदीप धुकटे, उपप्राचार्य शिवशंकर तटाळे, पर्यवेक्षक शुभांगी घोंगडे, मकरंद अंकलगी, उत्सव विभाग प्रमुख नरेंद्र होनराव उपस्थित होते. यावेळी संविधानाचा आत्मा असलेल्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन सकाळ सत्र प्रा.डी.के.पाटील तर दुपार सत्र सुनील भोरे यांचेसमवेत सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सामूहिकरीत्या करून लोकशाही मूल्यांप्रति आपली कटिबद्धता व्यक्त केली.