सोलापूर : भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून भीम प्रतिष्ठान, सोलापूर यांच्या वतीने एक अभिनव आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. २६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त एन. एम. वाडिया हॉस्पिटल ट्रस्टला भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेची आकर्षक फोटो फ्रेम तसेच संविधानाचे पुस्तक भेट देण्यात आले.
भारतीय संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा प्रसार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत व्हावा, या उद्देशाने भीम प्रतिष्ठानतर्फे संविधानाच्या प्रास्ताविकेच्या फ्रेमचे विविध संस्था आणि संघटनांना वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात एन. एम. वाडिया हॉस्पिटल ट्रस्टपासून करण्यात आली.
याप्रसंगी एन. एम. वाडिया हॉस्पिटल ट्रस्टचे सचिव श्री. शिरीष गोडबोले, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर सोडल, प्रशासकीय अधिकारी श्री. सचिन देशपांडे, गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य डॉ. घुली, श्री. संजय पटेल, ॲड. हबीब तसेच श्री. रंगनाथजी बंकापूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
भीम प्रतिष्ठानचे संस्थापक दलितमित्र बाबा बाबरे, अध्यक्ष वीरेंद्र हिंगमिरे, सचिव अकबर शेख, रंजन, कार्याध्यक्ष सिद्धांत बाबरे तसेच प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.
संविधानाचे महत्त्व जनमानसात रुजविणे, संविधानिक मूल्यांची जाणीव निर्माण करणे आणि संविधानाचा संदेश समाजातील विविध संस्था व संघटनांपर्यंत पोहोचविणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे भीम प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्याध्यक्ष सिद्धांत बाबरे यांनी केले तर आभार अध्यक्ष वीरेंद्र हिंगमिरे यांनी मानले.