माळशिरस ….. येथील डॉ अहिल्या विठ्ठल वाघमोडे यांची जगातील सर्वाथ मोठी व प्रतिष्ठीत असलेल्या वैज्ञानिक संस्था लिनियन सोसायटी ऑफ लंडन युनायटेड किंगडम मध्ये फेलो (FLS) या पदावर नुकतीच निवड झाली असून त्यांचा सन्मान माळशिरसचे माजी नगराध्यक्ष डॉ आप्पासाहेब देशमुख यांनी कार्यालयात केला .
डॉ अहिल्या वाघमोडे यांचे प्राथमिक शिक्षण ब्लू बर्ड इंग्लिश स्चूल येथे तर माध्यमिक गोपाळराव देव प्प्रशाळेत झाले त्यानंतर उच्च शिक्षण शारदानगर येथे झाले .शिवाजी विद्यापीठातून पी एच डी केली.त्या कराड येथील श्री सद्गुरू संत गाडगे महाराज शिक्षण संस्थेत कार्यरत आहेत.त्यांनी १० पुस्तके लिहिली असून अनेक व्याख्याने दिली आहेत .
यावेळी बोलताना म्हणाल्या माझे हे श्रेय केवळ गुरुजन व माझ्या पाठीशी खंबीर पणे असलेल्या माझ्या वडील ,पती व बंधुमुळे मिळाले असून शारदानगर येथे मला शिक्षणा बरोबर सर्वांगीण विकासाची संधी मिळाली .गावाच्या माणसांनी केलेल्या सत्कारामुळे मी भारावून गेले आहे,यावेळी डॉ आप्पासाहेब देशमुख, प्रा.,मच्छिंद्र गोफणे,माजी मुख्याध्यापक दत्तात्रय वाघमोडे ,वैभव जानकर,प्रा .योगेश गुजरे,दिपक घोडके,अड .एन व्ही वाघमोडे,आण्णासाहेब देशमुख.राजेंद्र वळकुंदे,सत्यजित गोफणे ,संतोष मस्के,विजय मंजुळे, गणेश बोराटे .आदी उपस्थित होते.



















