टेंभुर्णी – सरकार उजनी वरील एआय डेटा सेंटर सह इतर प्रकल्पातून नौक-या मिळणार असल्याचे सांगत दिशाभूल करीत आहे.मात्र मुठभर नौक-यासाठी तीन जिल्ह्यातील लाखो शेतकरी रस्त्यावर उतरू देणार नाही तसेच सरकारला जे काय करायचे ते रेटून करायचे अशी सवय आहे.परंतु तुम्ही जर रेटून करणार असेल तर आम्ही उजनी धरण परिसरात प्रास्तावित असलेले एआय डेटा सेंटर, अणुऊर्जा, ग्रीन हायड्रोजन, बॅटरी आणि सोलर एनर्जी प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही.असा इशारा खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी दिला ते शुक्रवारी सायंकाळी
उजनी धरण परिसरात प्रास्तवित असलेल्या एआय डेटा सेंटर सह सर्व प्रकल्प रद्द करण्याचे मागणीसाठी भव्य मशाल मोर्चा काढण्यात आला यावेळी ते बोलत होते यावेळी माढा, इंदापूर करमाळा या तालुक्यातील शेतकरी व नागरिक, मच्छीमार उपस्थित होते.
यावेळी बोलताना धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले कि अमेरिका तिथे होत असलेल्या ३०० ए आय डेटा सेंटर ला स्टे देतेय आणि हे प्रकल्प इकडे कशासाठी आणले हे चालले हे समजत नाही. तसेच पुणे, सोलापूर, धारावी,अहिल्या नगर भागातील नागरिकांनी जोपर्यंत उजनीत कृष्णेचे नवीन पाणी उजनीत येत नाही तोपर्यंत उजनीवर कोणताही प्रकल्प आणू नये.तसेच शासनाने लवकरात लवकर जनसुनावणी घ्यावी अन्यथा हे प्रकल्प होऊ देणार नाही असा गर्भीत इशारा मोहिते-पाटील यांनी दिला.यावेळी शिवाजी पाटील चांदजकर,संजय कोकाटे,
मयुर पाटील,प्रदिप दादा गारडकर :
आरपीआयचे नंदकुमार केंगार,ॲड विघ्ने,ॲड खडतरे,नारायण आबा पाटील यांनी आपल्या मनोगतातून उजनी वरील प्रकल्पा ला विरोध केला.माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील,
खासदार धैर्यशील मोहिते-पाटील,माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार नारायण आबा पाटील,वसंत देशमुख, शिवसेनेचे संजय कोकाटे नंदनीदेवी मोहितेपाटील,सत्यप्रभादेवी रणजितसिंह मोहिते पाटील,शिवांशिका मोहिते-पाटील,शितल देवी मोहिते पाटील, रावसाहेब देशमुख आदी जण उपस्थित होते.
संजयमामा शिंदे यांचा फोनवरून पाठींबा
या मशाल मोर्चाला माजी आमदार संजयमामा शिंदे अनुपस्थित होते.मात्र त्यांनी फोनवरून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
एआय डेटा सेंटरचे भूत उतरावे लागेल,
नारायण आबा पाटील :
शासनाने उभा केलेले एआय डेटा सेंटरचे भूत उतरावे लागेल,अनेकांच्या जमीनी पाण्याखाली गेल्याने,बेघर व्हावे लागले,सर्वांनी एकत्र रहावून प्रकल्प रद्द करण्यासाठी एकदिलाने रस्त्यावर उतरून प्रकल्पाला माघारी पाठवावे लागेल.