कल्याण – इंडिया तायक्वांदो आणि वर्ल्ड तायक्वांदो यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत मुंबईच्या येएम अकॅडमीच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत १८ पदकांची कमाई केली. या स्पर्धेत २०हून अधिक देशांतील १,५०० पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.
भारतात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात इंडिया तायक्वांदोचे नामदेव शिरगावकर यांचे योगदान लाभले. महाराष्ट्रातील खेळाडूंना तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष संदीप ओंबासे, सचिव गफार पठाण आणि खजिनदार डॉ. प्रसाद कुलकर्णी यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले.या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक अजय गायकवाड आणि बिनू मथाई यांचे मार्गदर्शन लाभले.
पदक विजेते खेळाडू :
अजय गायकवाड, श्वेता शेवाळे, रूथ वास, वेदांत पडवळ, अद्वैत रेडेकर, रज्योशा रतिंद्र हंकारे, दिव्यांशी कुलकर्णी, मेइना कुमार, आराध्य उतेकर, रितेश कांबळे, जिया शिंदे, इशित गोलांबडे, अर्शीन फातिमा, मल्हार माळवे, सुजय कसारे, ध्रुवन चौधरी, मेइया रुपेश, आशिष गुप्त आणि तुषार पेज.





















