कासेगांव – पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त कासेगांव येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात एकूण १०४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने रक्तदात्यांची संख्या शंभरी पार गेली.
आमदार आवताडेंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या रक्तदान शिबीर या उपक्रमातून अनेकांचे प्राण वाचविण्याचे मोलाचे कार्य होत असल्याचे सभापती सोमनाथ आवताडे यांनी बोलताना सांगितले. या स्तुत्य उपक्रमाबद्दल त्यांनी आयोजकांसह, रक्तदान केलेल्या ग्रामस्थांचे आभार मानले.
या कार्यक्रमास मंगळवेढा नगरपरिषदचे नगरसेवक सोमनाथ आवताडे,पंढरपूर पंचायत समितीचे माजी उपसभापती विजयसिंह देशमुख,माजी पंचायत समिती सदस्य प्रशांत देशमुख,तुकाराम कुरे,हनुमंत ताटे,सज्जन जाधव, तुकाराम कचकल,अनिकेत देशमुख,विकास ढवळे,केतन देशमुख,आमदार समाधान आवताडे यांचे समर्थक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Views: 11